Latest Marathi News
Ganesh J GIF

सुनेत्रा पवार यांच्या नावावर ५८ कोटीपेक्षा जास्त मालमत्ता बघा सविस्तर बातमी

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्र जोडले असून यात संपत्तीविषयी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर ५८ कोटीपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता तर १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ रूपयांची जंगम मालमत्ता आहे. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या हातातील रोख रक्कम ३ लाख ३६ हजार ४५० रुपये आहे. बँकेत त्यांच्या नावावर २ कोटी ९७ लाख ७६ हजार रुपये आहे. तर पती अजित पवार यांच्या बँकेतील ठेवी २ कोटी २७ लाख ६४ हजार ४५७ रुपये आहेत.सुनेत्रा पवार यांच्या नावावर १२ कोटी ११ लाख १२ हजार ३७४ रुपयांचे कर्ज देखील आहे. अजित पवार यांच्या नावावर देखील ४ कोटी ७४ लाख ३१ हजार २३९ रुपयांचे कर्ज आहे.

सुनेत्रा पवार यांनी शेअर्समध्ये १५ लाख ७९ हजार ६१० रुपये गुंतवले आहेत.तर बचत योजनांमध्ये ५६ लाख ७६ हजार ८७७ रुपये गुंतवले आहेत.त्यांच्या व्याजाचे मूल्य ६ कोटी ५ लाख १८ हजार ११६ रुपयांचे आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे ३४ लाख ३९ हजार ५६९ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे आहेत. यात चांदीची ताटेही आहेत.सुनेत्रा पवार यांच्याकडे १० लाख ७० हजारांच्या किमतीच्या गाड्या असून यामध्ये १ ट्रॅक्टर आणि २ ट्रेलर आहेत.सुनेत्रा पवारांकडे ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यात शेतजमिन आणि बिगरशेत जमिनीचा समावेश आहे.सुनेत्रा पवारांच्या नावे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ रुपयांची जंगम मालमत्ता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानावे १३ कोटी २५ लाख ६ हजार ०३३ रुपये जंगम मालमत्ता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!