
प्रियकरासाठी सासूची हत्या आणि पतीवरही हल्ला
पूजाचे कारनामे पाहून पोलिसही चक्रावले, दीर, प्रियकर आणि सासरे तिचे सगळेच प्रताप समोर
झासी – एक नारी सब पे भारी अशी हिंदीत एक म्हण आहे. पण उत्तर प्रदेशमधील झासीत एका नारीने अनेक पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढत भयंकर कांड केले आहे. अखेर त्या महिलेला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. ते खुलासे ऎकून पोलिसही हैराण झाले.
झासीच्या टहरौली परिसरात २२ जून रोजी सुशीला राजपूत यांची हत्या करण्यात आली होती. सुशीला यांच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी सुशीलाची सुन पुजाला अटक केली आहे. पूजाच्या चाैकशीत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी पूजा पूजा जाटववर तिच्या बहिणीसोबत आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून सासूच्या खुनाचा आरोप आहे. पूजाचे पहिले लग्न झाशी येथील एका रेल्वे कर्मचाऱ्यासोबत झाले होते. पूजाच्या चारित्र्यामुळे तो तिच्यावर नाराज होता. त्यामुळे संतापलेल्या पूजाने पतीवर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे पूजा तुरुंगात गेली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पूजा खटल्याच्या संदर्भात न्यायालयात जाऊ लागली, तेव्हा तिची ओळख कल्याण राजपूत या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीशी झाली. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे एकत्र राहू लागले. एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कल्याणचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. कल्याणचे वडील अजय राजपूत यांनी तिला घरी आणले आणि तिला आश्रय दिला. पूजाचे या दरम्यान मृत पती कल्याणचा विवाहित मोठा भाऊ संतोष राजपूत याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांना एक मुलगीही झाली. मुलगी झाल्यानंतर संतोषची पत्नी रागिणीनेही हे नाते नाईलाजानं स्वीकारले. इतकेच नाही, तर सासरा अजयसोबतही पूजाचे अनैतिक संबंध होते असे आरोप केले आहेत. पूजालाही पती कल्याणच्या वाट्याला आलेली आठ एकर जमीन विकून ग्वाल्हेरला स्थलांतरित व्हायचे होते. पण त्यात सासू अडचण होती म्हणून पुजाने हे कांड केल्याचे तपासातून समोर आले आहे. या कामात तिची बहीण कामिनी आणि प्रियकर अनिलला अटक केली आहे.
पोलिसांनी सून पूजा जाटव, तिची बहीण कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्मा यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. त्यांच्यावर खून, गुन्हेगारी कट आणि दरोड्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता इतर घटनांचाही तपास पोलीस करत आहेत.