Latest Marathi News
Ganesh J GIF

खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

बावधन येथे महावितरणचे सबस्टेशन झाले नाही, तर २० नोव्हेंबर रोजी करणार उपोषण

पुणे दि ३(प्रतिनिधी)- वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २० नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन सबस्टेशनसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. यासाठी आवश्यक असणारी जागाही सुचविण्यात आली आहे. परंतु तरीही येथे सबस्टेशन उभारण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही, असे सांगत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. महावितरण, पुणे महापालिका, पीएमारडीए आणि पुणे जिल्हाधिकारी यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केले असून येत्या २० नोव्हेंबर पर्यंत सबस्टेशन बाबत कार्यवाही झाली नाही, तर आपण स्वतः उपोषणाला बसू असा।इशारा दिला आहे.

महावितरणने याची तातडीने दखल घेऊन सबस्टेशनचा विषय मार्गी लावला नाही तर बावधनकरांसाठी आपण स्वतः २० नोव्हेंबरला येथे उपोषणाला बसणार आहोत. जनतेच्या सुविधेसाठी हे सबस्टेशन आवश्यक आहे, परंतु जागा सुचवलेली असतानादेखील उर्जा खात्याकडून याबाबत कार्यवाही होत नाही हे खेदजनक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!