दौंड येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड या प्रशालेमध्ये, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे( डायट ) यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय तालुका स्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये विध्यार्थ्यांनी 12 एकांकिका सादर केल्या.या स्पर्धेचे उदघाटन, कार्यक्रमांस लाभलेले प्रमुख अतिथी राज्य राखीव पोलीस दल कामांडंट राजलक्ष्मी शिवणकर प्रशालेचे प्राचार्य – विशाल जाधव, उप प्राचार्या लक्ष्मी रत, पुणे जिल्हा परिषद नाट्य समन्वयक प्रमोद काकडे, स्पर्धेस परीक्षक म्हणून लाभलेले, बापूराव कदम सचिव पुणे जिल्हा कलाध्यापक संघ, सौ. अरुंधती बर्गे, सौ सारिका हिप्परकर,या मान्यवरांच्या शुभहस्ते, दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले.
यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांनी, सांगितले की, प्रत्येक विध्यार्थ्यांच्या अंगी, निरनिराळे कलागुण असतात. ते पालकांनी व शिक्षकांनी ओळखून, त्यांच्या कला गुणांना वावं कसा मिळेल हे पाहावे.तसेच निरनिराळे कलागुण असणाऱ्या विध्यार्थाना त्यांची कला जोपासण्यासाठी पोदार प्रशाला सदैव कार्यशील व तत्पर आहे. तसेच प्रत्येक विध्यार्थाने निरनिराळ्या कलेत नैपुण्य प्राप्त केलेल्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त करून उपस्थित सर्व विध्यार्थी शिक्षक यांना स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेत, मुलांचे भावविश्व, मला तुम्ही हवे आहात, मोबाईल चा अतिवापर आरोग्यास घातक, स्वच्छता अभियान, प्लास्टिक समस्या, थोडीशी गंम्मत, मुलांचे हरवत चाललेले बालपण, अश्या अनेक विषयांवर तालुक्यातील अनेक शाळांनी एकांकिका सादर केल्या. यावेळी, बापूराव् कदम, सारिका हिप्परकर, अरुंधती बर्गे, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे शिक्षक – अतुल मोरे यांनी तर सूत्रसंचालन, संतोष कारंडे, रजनीकांत कारंजकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी जिल्हा परिषद, नाट्य समन्वयक प्रकाश खोत, महेश मोरे अमोल कदम, व शालेय सांस्कृतिक विभाग यांनी मोलाचे सहकार्य केले.