प्रसिद्ध अभिनेत्रीची ही कंपनी मुकेश अंबानी खरेदी करणार
बाजारातील मुळ किमतीपेक्षा दुप्पट दराने होणार विक्री, विक्रीचे कारणही समोर, कंपनी बनवते हा प्रोडक्ट
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते अभिनेत्री चित्रपटाव्यतिरिक्त व्यवसाय देखील करत असतात. बाॅलीवूड अभिनेत्री आलिया भट देखील चित्रपटाव्यतिरिक्त एक कंपनीची मालक होती. पण लवकरच तिची ही कंपनी एका मोठा उद्योगसमूह विकत घेणार आहे. कोट्यावधीरुपयात हा व्यवहार करण्यात आला आहे.
मुकेश अंबानी यांची रिलायन्सचा एक भाग असलेली रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड. कंपनीने अभिनेत्री आलिया भटचा किड्सवेअर ब्रँड एड-ए-मम्मा सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटींमध्ये विकत घेणार असल्याची चर्चा आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी रिलायन्स कंपनीने आलिया भट्ट हिची कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया भट्टची कंपनी एटर्नलिया क्रिएटिव्ह Ed-a-Mamma ब्रँड लहान मुलांचे कपडे तयार करते. आलिया भट्ट या कंपनीची क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. या कंपनीची सध्या मार्केट व्हॅल्यू १५० कोटी रुपये आहे. तसेच या ब्रँडअंतर्गत वेगवेगळ्या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मद्वारे कपड्याची विक्री केली जाते. आलिया भट्टची कंपनी नफ्यात आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला पुढील आठवड्यात अंतिम स्वरुप मिळू शकते. या महिन्यातच ही डील होण्याची शक्यता आहे. या डीलमधून आलिया भट्ट हिला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
रिलायन्स आणि इटर्निया क्रिएटिव्ह अँड मर्चेंडायझिंग, एड-ए-मम्माच्या मागे असलेल्या युनिटकडून कोणतेही विधान आलेले नाही.पण पुढील दहा दिवसांत सौदा होण्याची शक्यता आहे. या व्यवहाराने रिलायन्सची किड्सवेअरमध्ये मजबूत पकड निर्माण होईल.काही दिवसांपूर्वी रिलायन्स समूहाने कॅम्पा कोला ब्रँड खरेदी करुन तो बाजारात उतरवला होता. आता किड्स वेअरमध्ये रिलायन्स तयारीने उतरत आहे.