Latest Marathi News
Ganesh J GIF

इरसाळवाडी दरड दुर्घटनेतील लोकांचे पुनर्वसन करुन सर्व मदत पोहचवा

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी इरसाळवाडीला भेट, नागरिकांशी संवाद साधून दिला आधार

रायगड दि २१(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या इरसाळवाडीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक लोकांशी संवाद साधून दुर्घटनेची माहिती घेतली. या घटनेतून सुखरूप वाचलेल्यांना नाना पटोले यांनी आधार दिला. सरकारने तातडीने लोकांचे पुनर्वसन करावे व त्यांना दररोज लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तुंची मदत पोहचेल याची व्यवस्था करावी असे पटोले म्हणाले.

इरसाळवाडीतील घटना अत्यंत दुःखद आहे. वेळीच या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असते तर नाहक बळी गेले नसते पण सरकारने योग्यवेळी दखल घेतली नाही. मागील तीन चार दिवसापासून अतिवृष्टीचा इशारा दिला जात असताना धोकादायक, दरडप्रवण भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले असते तर अनेक जीव वाचले असते. आतातरी सरकारने जलदगतीने हालचाली करुन लोकांना सर्व प्रकारची मदत मिळेल याची व्यवस्था करावी, असे पटोले म्हणाले. दरम्यान दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असुन अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. अद्यापही मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

यावेळी नाना पटोले यांच्याबरोबर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, रायगड युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!