
”मला आणि माझ्या पतीला आम्हा दोघांना बाळ नको होत”
अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, गरोदर असल्याचे समजल्यावर बसला होता धक्का, म्हणाली...
मुंबई – बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. पण यावेळी तिच्या प्रेग्नंसी फोटोशुटची जोरदार चर्चा रंगली आहे. पण यावेळी तिच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राधिकाने आपटेने तिचा मातृत्वाचा प्रवास शेअर केला आहे. यावेळी तिने आपल्या मातृत्वाचा प्रवास शेअर केला आहे. तिला आणि तिच्या पतीला बाळ नको होते, असे ती म्हणाली आहे. ति म्हणाली की, “खरं तर मला ते असं सार्वजनिकरित्या सर्वांना सांगायचं नव्हतं, पण मी सर्वांना सांगितलं. मी चुकून गरोदर राहिले नव्हते, पण आम्ही प्रयत्नही करत नव्हतो. त्यामुळे जेव्हा मी गरोदर आहे, असं कळाल्यावर आम्हाला धक्का बसला. कारण आम्ही त्याबद्दल विचारच केला नव्हता. मला वाटतं की जेव्हा लोकांना हे माहीत असतं की त्यांना बाळ हवंय की नाही, तेव्हा बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. पण आमच्या बाबतीत आम्हा दोघांनाही मुलं नको होती, पण मूल झाल्यास ते कसं असेल याची एक टक्का उत्सुकता नक्कीच होती”. असेही राधिका म्हणाली आहे. राधिका आपटे तिचं वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा विशेष प्रयत्न करत होती. पण जेव्हा ती बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पोहोचली, त्यावेळी तिचा बेबीबंप पाहून सर्वच थक्क झाले होते. विशेष म्हणजे बाळाच्या जन्माच्या एक आठवड्यापूर्वीच त्यांनी फोटोशूट केलं होते. त्या फोटोशुटची खुप चर्चा झाली होती.
राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले आहे. दरम्यान राधिकाने मागच्या आठवड्यात एक फोटो शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली होती. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लॅपटॉपसमोर आपल्या मुलीला कुशीत घेऊन बसली होती. लेकीच्या जन्मानंतर पहिली वर्क मीटिंग अशा आशयाचं कॅप्शन देत राधिकाने फोटो पोस्ट केला होता.