Just another WordPress site

म्हणून नागेशने केली पत्नी दिपालीची हत्या

आंतरजातीय लग्नाचा दुर्दैवी शेवट, धुळे शहरात खळबळ

धुळे दि २८(प्रतिनिधी)- धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर येथे कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. किरकोळ वादातुन ही हत्या करण्यात आली आहे. दिपाली नागेश कानडे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.

GIF Advt

पोलीसांनी दिपालीचा पती नागेश दगडू कानडे याला अटक केली आहे. नागेश दगडू कानडे आणि दिपालीचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागेश कानडे याचे मानसिक संतुलन बिघडले होते त्यामुळे तो सतत वाद घालायचा घटनेच्या दिवशीही किरकोळ वादातून नागेश कानडे याने धारदार शस्त्राने पत्नी दिपालीच्या डोक्यात वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर दिपालीला तिचे दिर गणेश कानडे यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिपालीला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पती नागेश कानडेला अटक केली आहे. पण आईचा खून आणि वडिलांना अटक झाल्याने त्यांचा मुलगा मात्र अनाथ झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!