Latest Marathi News

महाठग सुकेश चंद्रशेखरला बनायचे होते ‘या’ अभिनेत्रीच्या मुलांचे बाप

एका मुलाखतीत अभिनेत्रीचा मोठा दावा, लग्नाची मागणी घातल्याचाही खुलासा

मुंबई दि २८(प्रतिनिधी) – बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि इतर काही अभिनेत्रींना गंडा घालणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखरबद्दल सध्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. जॅकलिन फर्नाडिस आणि नोरा फतेहीच नाही तर इतर अभिनेत्रींनाही त्याने फसवले आहे. आता यात चाहत खन्नाचेही नाव समोर आले आहे.


एका मुलाखती दरम्यान चाहत खन्नाने सुकेशने तिला ब्लॅकमेल केल्याचे सांगितले आहे.चाहत खन्नाला एके दिवशी एका शाळेतील कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन तिला तिहार जेलमध्ये नेल्यात आले. जेलची खोली लॅपटॉप, महागडी घड्याळं आणि इतर मौल्यवान वस्तूंनी पूर्णपणे भरलेली होती. याबरोबरच तिथे बऱ्याच ब्रॅंडेड बॅग्ससुद्धा होत्या. त्या छोट्या खोलीत सगळ्या सुखसोयी होत्या तिथे सुकेश तिला भेटल्यावर म्हणाला की, तो माझा टीव्ही शो ‘बडे अच्छे लगते हैं’ पाहतो आणि मला भेटू इच्छितो. मी त्याला म्हणालो, ‘मला इथे का बोलावलं? मी माझ्या सहा महिन्यांच्या बाळाला घरी सोडले आहे आणि कार्यक्रम आहे असं समजून इथे आले. तेव्हा तो एका गुडघ्यावर बसला आणि म्हणाला की त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. मी विवाहित असून दोन मुले आहेत, असे सांगितल्यावर तो म्हणाला की, माझा नवरा माझ्यासाठी योग्य माणूस नाही आणि मला तुझ्या मुलांचा बाप बनायचे आहे. असा दावा करत एंजल नावाच्या महिलेने दोन दिल्याचे चाहत खन्नाने सांगितले आहे.


सुकेश संदर्भात ३ जानेवारीला जॅकलिनसह चाहत खन्नानेसुद्धा पटियाला कोर्टात या केससंदर्भात जबाब नोंदवला आहे. याशिवाय यात आता निक्की तांबोळी, सोफिया सिंह या अभिनेत्रींचीही नावे समोर आली आहेत. महाठग सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!