‘नाैटंकी जितेंद्र आव्हाड औरंगजेबजींना क्रूर मानत नाहीत’
बावनकुळेंच्या औरंगजेबजी उल्लेखाने वादंग, राष्ट्रवादीने वचपा काढला
पालघर दि ५(प्रतिनिधी)- राज्यात महापुरूषांवरुन होत असलेले वाद थांबताना नाव घेत नाहीत. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओैरंगजेबचा आदरार्थी उल्लेख केला आहे. बावनकुळे यांच्या औरंगजेबा बाबतच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद उफाळण्याची शक्यता निर्माण आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर जिल्ह्यात पक्ष बांधणी व पक्षांतर्गत कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांना आव्हाडांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस असून नौटंकी आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजींना क्रूर मानत नाहीत’ असे वक्तव्य हिंदीतून चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांनी औरंगजेबाचा चक्क ‘औरंगजेबजी’ असा आदरार्थी उल्लेख केला त्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. बावनकुळेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर जोरदार टीका देखील होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही तोडलं असतं’ असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर भारतीय जनता पार्टीने आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिलल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का? pic.twitter.com/6Mk18tjoZx
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 4, 2023
बावनकुळेंवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. क्रूरकर्मा औरंग्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ज्यावेळी ‘औरंगजेब जी’ असं सन्मानानं म्हणतात, त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.