बाॅलीवूडच्या या अभिनेत्रीचे या अभिनेत्यासोबत ब्रेकअप?
लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच नात्याला पुर्णविराम, इतक्या वर्षानंतर होणार वेगळे
मुंबई दि ४(प्रतिनिधी)-. बाॅलीवूडमध्ये काही स्टार कपल लग्नबंधनात अडकत असताना, दुसरीकडे मात्र बाॅलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री तारा सुतारियाचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. बॉयफ्रेंड आदर जैन सोबतच्या नात्याला तिने पूर्ण विराम दिला आहे. दोघांनी आपल्या सहमतीने या नात्याला पूर्णविराम दिला आहे.
मलायका अरोराने २०१९ वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीनंतर तारा आणि आदर यांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले. तारा आणि आदरने ऑगस्ट २०२० मध्ये रिलेशनशिप असल्याचे सोशल मीडियावर जसहीर केले होते. तारा आणि आदर दोघंही अनेकदा एकत्र दिसायचे. दोघं एकमेकांसोबतचे अनेक फोटोही पोस्ट करत होते. हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. दोघेही २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होत होती, मात्र त्याआधीच या दोघांचे ब्रेकअप झाले आहे.ते परस्पर संमतीने वेगळे झाले असले तरी त्यांची मैत्री कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तारा आणि आदर या दोघांचं लग्न झालं असतं, तर अभिनेत्री करीना कपूर खान नात्याने ताराची नणंद असती.
ताराने कमी कालावधीत बी टाउनमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.तारा सुतारिया शेवटची अॅक्शन थ्रिलर फिल्म एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसली होती, ज्यामध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि अर्जुन कपूर देखील होते.ती आता अपूर्वासाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये धैर्य करवा तिचा को स्टार असणार आहे.