Just another WordPress site

फक्त पोरगी द्या म्हणणाऱ्या भाच्याने मामासोबत केला भलताच प्रकार

नांदेड जिल्ह्यातील घटनेने सगळेच चक्रावले, पण खब-याने बिंग फोडले

नांदेड दि १४ (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये मामा मुलीचे लग्न आपल्याशी लावून देत नसल्याचा राग मनात धरून भाच्यानेच झोपेतच मामावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चाभरा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

GIF Advt

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोजगारांसाठी रोडगी येथील बालाजी काकडे हे गत पन्नास वर्षापूर्वी चाभरा येथे स्थायिक झाले. त्यांना या ठिकाणी चांगला रोजगार मिळत होता सर्व काही चांगले होते. त्यांची बहिण वनिताताई बंडू जाधव हे मुळगाव सांडस तालुका कळमनुरी येथील असून त्यांना तेथे रोजगार मिळत नसल्याने तेही चाभरा येथे कामानिमित्त आले व पंधरा ते वीस वर्षाखाली स्थायिक झाले. दोन्ही कुटुंबे रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असे. बालाजी काकडे यांना दोन मुली असून त्यांचा भाचा एकनाथ जाधव याची एका मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथ कुठलेही काम करत नसल्यामुळे मामांनी नकार दिला. मामाने मुलगी देण्याचा नकार दिल्याचा राग मनात ठेवत संतापलेल्या भाचा एकनाथाने मामाची हत्या केली होती.

याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी शोध मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी भाचा एकनाथ जाधव याला अटक केली. आरोपी भाच्याने मामाचा खून केल्याचे कबूल केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!