Latest Marathi News

प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सन्मान

ग्रामपंचायत कोरेगाव मुळ व श्रीदत्त पतसंस्थेच्या वतीने सन्मान

लोणी काळभोर पुणे दि १२(प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त गुरुवार दि. १२ जानेवारी रोजी कोरेगाव मुळ ग्रामपंचायतच्या वतीने प्रिंट व डिजीटल मिडिया मिडिया पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन,पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

पत्रकारिता हा पत्रकाराचा धर्म असतो. समाजातील वाईट गोष्टींवर ताशेरे ओढणे, जे सत्य आहे ते सत्य आहे वाईट गोष्टी लेखणीतून समाजासमोर मांडणे. यातुन जाणीवपूर्वक कोणाला दुखवायचे नसते असे यावेळी प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप म्हणाले.
कारेगाव मुळ ग्रामपंचायतचे सरपंच विठ्ठल शितोळे व ग्रामपंचायत सदस्य यांनी यावेळी प्रिंट व डिजिटल मिडिया संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, हवेली तालुका अध्यक्ष संदिप बोडके, कार्याध्यक्ष सचिन सुंबे, उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, जिल्हा खजिनदार विजय काळभोर, तालुका खजिनदार श्रीनिवास पाटील, अमोल भोसले, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे यांना वृक्षरोप, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले.
कोरेगाव मुळ ग्रामपंचायतच्या विकासासाठी सदैव प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ सोबत राहिल अशी ग्वाही यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ बाप्पूसाहेब काळभोर यांनी दिली.
या कार्यक्रमावेळी सरपंच विठ्ठल शितोळे, सदस्य दत्तात्रय काकडे, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कड, माजी .उपसरपंच मनिषा कड, लोकेश कानकाटे , तालुका महिला सरचिटणीस राष्ट्रवादी सुप्रिया घावटे, पोलीस पाटील वर्षा कड, चिंतामण कड, सचिन कड, ग्रामसेवक आर एस जगताप उपस्थित होते.
या कार्यक्रमाते सुत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले तर आभार ग्रामसेवक आर एस जगताप यांनी मानले.
कुंजीरवाडी येथे श्रीदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा व हवेली पदाधिकाऱ्यां ची नुकतीच निवड झाली त्याबद्दल पतसंस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन पेठगावचे माजी सरपंच सुरज चौधरी, व्हाईस चेअरमन तुळशीराम चौधरी,तरडे गावचे माजी सरपंच मारुती बरकडे, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी , विजय टिळेकर ,मोहन कुंजीर ,चंद्रकांत टिळेकर, आदर्श सरपंच महादेव चौधरी ,सोमनाथ चौधरी ,विठ्ठल मारणे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाच्या बैठक कदमवाकवस्ती येथे पार पडली यावेळी
यावेळी प्रिंट डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी संघाच्या जिल्हा समन्वयक पदी पत्रकार तुकाराम गोडसे यांची निवडीची घोषणा केली
अध्यक्ष सुनिल जगताप यांनी सदर निवडीचे पत्र गोडसे यांना दिले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!