Latest Marathi News

सहा पोरांच्या बापाचे तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत अत्याचार

तीन मुलांच्या जन्मानंतर सत्य समोर येताच तरुणीला धक्का, जिल्ह्यात खळबळ

जळगाव दि १२(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या पत्नीपासून ६ अपत्य झाली असताना देखील तरुणाने २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळेवेळी अत्याचार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशाने चोपडा ग्रामीण पोलिसात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना चोपडा तालुक्यात समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणाचे आधीच लग्न झालेले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला एक दोन नव्हे तब्बल सहा अपत्य होती. तरी देखील त्याने एका २९ वर्षीय तरुणीला २०१६ ते २०२१ या काळात वेळेवेळी लग्नाचे आमिष देत तिच्यावर अत्याचार केले. या पाच वर्षांच्या अत्याचारातून पीडितेला देखील ३ मुलं झाली आहेत. आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याच लक्षात आल्यावर तरुणीला मोठा धक्का बसला. एवढेच नव्हे तर तरुणाच्या घरातील इतर सदस्यांनी पीडितेला घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याबाबत पिडीतेने न्यायालयात धाव घेत तक्रार केली आहे. पण या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या तक्रारी नुसार या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये बुधवारी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!