Latest Marathi News
Ganesh J GIF

डंपर टॅंकरच्या विचित्र अपघातात नवविवाहीतेचा मृत्यू

पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे दि २६(प्रतिनिधी)- सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रस्तावर पडलेल्या नवविवाहितेला समोरून येणाऱ्या टँकरने चिरडल्याने झालेल्या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला आहे. रामेश्वर पतसंस्थेच्या समोर हा अपघात घडला.

शिवाणी शैलेश पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाणी पाटील या आपल्या पतीसह दुचाकीवरून कामाला निघाल्या होत्या. किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेच्या समोर वाहनांची वर्दळ असताना मागून आलेल्या अवजड डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर शिवाणी पाटील पतीसह रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टॅंकरचे चाक शिवाणी पाटील यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर आणि टॅंकर दोन्ही वाहनांचे चालक वाहनं घेऊन पसार झाले. या दोन्हीही वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे. हा अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. पण यावेळी अवजड वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर नियोजन करण्याची मागणी होत आहे.

“डंपर व टॅंकर या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. अपघाताचा व्हिडिओ मिळाला असून लवकरच दोन्ही वाहने व चालक सापडतील. दुर्दैवाने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.” अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक वांगडे यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!