Latest Marathi News
Ganesh J GIF

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

वर्ल्डकपचे अँथम साँग सोशल मिडीयावर हिट, बाॅलीवूडचा हा अनेक अभिनेता मुख्य भूमिकेत, या क्रिकेटपटूची पत्नीही दिसणार?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- भारतात होणारा एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक काही दिवसांवर आला आहे. भारत २०११ नंतर परत एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक असेल. पण यासर्व घडामोडी घडत असतानाच या विश्वचषकाचे अधिकृत गाणे लाँच करण्यात आला आहे. अभिनेता अभिनेता रणवीर सिंह यात मुख्य भूमिकेत आहे. या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भारतात होणाऱ्या वर्ल्डकपची सुरूवात ही ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना हा १९ नोव्हेंबरला होणार आहे. आता यासाठीचे अधिकृत गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शन प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. रणवीर या व्हिडिओत ट्रेनमध्ये बसलेल्या एका मुलाला क्रिकेट फॅन होणं म्हणजे काय हे समजावून सांगत आहे. ‘दिल जश्न बोले’ असे या गाण्याचे बोल आहेत. यात स्वतः प्रीतम आणि यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखिल दिसणार आहे. या गाण्यात पारंपारिक भारतीय वादनाला आंतरराष्ट्रीय फ्लेवर देण्यात आला आहे, ज्यातून जगभरातील विविध संस्कृती, समुदाय, भावना आणि चाहत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे अँथम सध्या चांगलेच चर्चेत असून सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून चाहत्यांना वर्ल्डकपसाठी वनडे एक्सप्रेसमध्ये चढण्यास सज्ज व्हा असा संदेश देण्यात आला आहे. दरम्यान वर्ल्डकप २०२३ च्या स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे १० संघ खेळणार आहेत. साखळी फेरीत हे सर्व १० संघ आमने-सामने येणार आहेत. विशेष म्हणजे गाण्यात १० अंगच्या जर्सीही दिसत आहेत. भारतात यावर्षी होणारा वर्ल्डकप हा एकूण १३ वा वर्ल्डकप असणार आहे. पण असे असले तरी भारत पहिल्यांदाच स्वतंत्रपणे वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे. कारण २०११ चा वल्डकप भारत श्रीलंका बांग्लादेश अशा तीन देशांनी एकत्रित आयोजित केला होता.

क्रिकेट विश्वचषक १२ वर्षानंतर भारतात परततोय. यापूर्वी २०११ मध्ये भारतात विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा १० शहरांमध्ये वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आशिया कप जिंकला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारत आपली मोहीम ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याने करणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!