Just another WordPress site

डेंग्यू झाल्याने तरुण शिक्षिकेचा मृत्यू ,पुण्यातील घटना

आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात मृत्यू

काळेवाडी,पिंपरी चिंचवड –  डेंग्यू (Dengue) झाल्याने काळेवाडीतील एका 22 वर्षीय तरुण शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिक्षक कुटुंबातील ही तरुणी नुकतीच पिंपरीतील पोतदार शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. ऋतुजा श्रावण भोसले (वय 22 वर्षे रा. काळेवाडी) असे या मृत शिक्षिकेचे नाव असून आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता.

GIF Advt

ऋतुजावर आज दुपारी काळेवाडीतील साईनाथ कॉलनी (Dengue) येथील स्मशान भूमीत अंतिमसंस्कार होणार आहे. तिचे वडिल श्रावण भोसले हे देखील काळेवाडीतील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत क्रिडा शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबात शिक्षकी पेशाची परंपरा आहे. यामुळे काळेवाडी, पिंपरी व आसपासच्या परिसरातील विद्यार्थी आणि पालकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!