Latest Marathi News
Ganesh J GIF

आधी प्रकल्प केले, आता ‘हे’ आमदारही गुजरातला जाणार

प्रकल्पानंतर आता आमदारांची गुजरातवारी, आमदार काय करणार

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आधीच राजकारण रंगले असताना आता राज्यातील १२ आमदार देखील गुजरातला जाणार आहेत. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे भाजपने प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज दाखल झाली आहे. त्यात १२ आमदारांचा समावेश आहे.

भाजपाने आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात एकूण बारा आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. गुजरातमधील सहा जिल्ह्यातील ३३ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गुजरारमध्ये जाणाऱ्या आमदारामध्ये आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्याबरोबर मनीषा चौधरी, संजय सावकारे, संजय केळकर, पराग अळवणी, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, निरंजन डावखरे, सुरेश भोळे, राहुल ढिकले, राजेश पाडवी, उमा खापरे यांचा समावेश आहे. या बारा आमदारांच्या मतदारसंघात गुजराथी समाज मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे गुजराती समाजाच्या नेत्यांशी गुजरातमध्ये असलेला कनेक्ट लक्षात घेऊन त्यांना या मोहिमेवर पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून गेलेले नेते त्यांना वाटून दिलेल्या मतदारसंघांमध्ये नागरिकांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेणार आहेत. गुजरातमध्ये यंदा भाजपाला काँग्रेसबरोबरच आपचेही आव्हान असणार आहे. त्यामुळे भाजपाने प्रचारात आघाडी घेत निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळातही अनेक नेते गुजरातला जाण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!