नवरात्राच्या तोंडावर पुण्यात सेक्स तंत्रामुळे वादाची ठिणगी
विद्येचे माहेरघर पुण्यात नेमक चाललंय तरी काय?
पुणे दि १६ (प्रतिनिधी) – नवरात्राच्या तोंडावर पुण्यात एका जाहिरातीमुळे खळबळ उडाली आहे, त्यामुळे पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेक्स तंत्रा या कोर्सचा नवरात्र स्पेशल कॅम्पची जाहिरात व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या जाहिरातीमुळे वाद होण्याची शक्यता आहे.
सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनचा सेक्स तंत्राचा हा तीन दिवसांचा कोर्स आहे. हा कोर्स कोठेहोणार या बाबत या जाहिरातीत उल्लेख करण्यात आलेल नाही. हा कोर्स १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान १५ हजार देऊन करता येणार आहे. या कोर्समध्ये वैदिक सेक्स तंत्र, स्नायूंना ताकदवान बनवणं, मेडिटेशन अशा वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण जाहिरातीमध्ये आयोजकांचा पत्ता आणि इतर कोणतीही माहिती नाही. त्यामुळे हा तरुणांना जाळ्यात ओढण्याचा तर प्रकार नाही ना अशी चर्चा रंगली आहे. पण या जाहिरातीमुळे राजकीय पक्षांबरोबर हिंदू संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.
हिंदू महासंघाने या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. या विकृतीला रोखण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू, असं दवे यांनी सांगितले आहे. तर मनसेच्या महिला आघाडीनेही या विरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीसांच्या सायबर विभागामार्फत याचा शोध घेतला जाणार आहे.