Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आढळरावांचा भाजपाकडून करेक्ट कार्यक्रम

भाजपाकडून लोकसभेचा उमेदवार निश्चित, आढळराव समर्थकांची गोची

पुणे दि १५ (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीला आणखी दोन वर्षांचा अवधी असला तरी भाजपने आतापासून व्यूव्हरचना आखायला सुरुवात केली आहे. सध्याच्या विद्यमान भाजपच्या खासदारांच्या जागा सोडून इतर १६ जागांवर भाजप जोर लावणार आहे. त्याच उद्देशातून शिरूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी २०२४ ला भाजपाचा उमेदवार जिंकणार अशी घोषणा केली आहे.परंतु शिवसेनेत असताना ज्या भीतीतून आढळरावांनी शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला तीच भीती आता आढळरावांना पुन्हा सतावते आहे. त्याला कारण ठरलंय भाजपचं मिशन लोकसभा!

शिरूर लोकसभा हा निर्मितीपासून शिवसेनेचा गड राहिला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांची या मतदारसंघावर इतकी पकड होती की त्यांनी थेट शरद पवार यांनाच आपल्या विरूद्ध उभे राहण्याचे आव्हान दिले होते. पण शरद पवार यांनी माढातून निवडणूक लढवली होती. आढळरावांनी या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली आहे. पण २०१९ ला राष्ट्रवादीने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. आणि आढळरावांना पहिला धक्का दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या आढळरावांना अस्मान दाखवत शिरूर लोकसभेत राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. पण राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर अनपेक्षितपणे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि विद्यमान जागा ज्या त्या पक्षाकडेच राहतील असे ठरले. तेंव्हापासुन आढळरावांची तडफड वाढली होती. पक्षाच्या अनेक कार्यक्रमातून त्यांनी ती बोलूनही दाखवली.पण शिरुरची जागा शिवसेना लढवेल असा शब्द त्यांना देण्यात आला नाही. त्यामुळे आढळरावांची राजकीय कारकिर्द संपल्याची चर्चा शिरूर मतदारसंघात रंगली होती.

अचानक राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाबे मोठा भूकंप झाला. त्यावेळी आढळतराव शिवसेनेतच राहिले. पण त्यांच्या जागेची चिंता त्यांना होतीच अशावेळी त्यांना पुण्यातून लोकसभेची तयारी करा असा आदेश आढळरावांना दिला आणि शिरुरची सद्दि संपणार या भीतीने आढळरावांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी आगामी निवडणुका शिंदे गट आणि भाजप युतीत लढतील अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे २०२४ साठी आपणच उमेदवार म्हणून तयारी सुरु केली. पण भाजपाने मिशन लोकसभेची घोषणा केली आणि आढळरावांची गोची झाली. केंद्रीय विकास राज्यमंत्री रेणुका सिंह यांच्यावर या मतदारसंघाची धुरा देण्यात आली. त्यांनीही शिरूर मतदारसंघात येत शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचे संघटन मजबूत करणार आहे. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पक्षश्रेष्ठीने माझ्यावर सोपविली आहे.निवडणुका होईपर्यंत अजून पाच वेळा या भागात मी येणार आहेय त्या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदार संघ पिंजून काढणार आहे. विकास हवा असेल तर येथे कमळ फुलले पाहिजे. खासदारही भाजपचाच हवा” असे म्हणत आढळरावांची अडचण वाढवली आहे. कारण ज्या भीतीपोटी शिवसेनेतुन आपण शिंदे गटात आलो ती भीती कायम असल्याने आढळराव चिंतेत आहेत. शिवसेनेत असताना पुणे लोकसभा हा पर्याय होता. पण आता शिंदे गटात गेल्याने तोही पर्याय हातातून गेला आहे. त्यामुळे आढळराव राजकीय विजनवासात गेले आहेत.

भाजपाने शिरूर लोकसभा जिंकण्याचा पण केला आहे. त्यासाठी त्यांचा उमेदवारही निश्चित आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची खासदार होण्याची इच्छा अनेक वेळा बोलून दाखवली आहे. यांच्या गेल्या वाढदिवसाला भावी खासदार म्हणून त्यांचे बॅनर्स संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात लागले होते. अगदी २०१९ ला सुदधा त्यांनी लोकसभेची तयारी केली होती. पण अमित शहा यांनी मातोश्रीत येत शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने त्यांना शांत व्हावे लागले पण आता मिशन लोकसभेमुखे ते पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. रेणुका सिंग यांच्याबरोबर त्यांनी पूर्ण मतदारसंघ पालथा घातला. त्याचबरोबर ते फडणवीस यांच्या मर्जीतले असल्याने भाजपाचे तेच उमेदवार असणार हे निश्चित आहे. शिरूरमध्ये २०२४ ला कमळ फुलले पाहिजे, येथे विकास हवा असेल, तर खासदारही भाजपचा हवा, असे रेणूकासिंह यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. त्यामुळे २०२४ च्या तयारीत असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची धाकधूक आणखी वाढली आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे आढळरावांशी ताकत लावण्याची शक्यता किती याचीही चर्चा आहे. कारण श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातही भाजपाने आपली ताकत वाढवण्याचा निर्धार केल्यामुळे आढळरावांसाठी आपले वजन वापरण्यापेक्षा ते आपल्या मुलासाठी प्रयत्न करणार हे निश्चित असल्याने शिंदे गटात जाऊन आढळरावांची कोंडी झालीये का? अशी चर्चा सध्या शिरुरमध्ये ऐकायला मिळत आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीतही सर्व आलबेल नसल्याची चर्चा आहे. कारण २०२४ ला शोकसभेसाठी अमोल कोल्हे यांच्याएैवजी पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. अलीकडे पार्थ पवार यांचे शिरूर मधील दाैरे वाढले आहेत. मावळचा अनुभव असल्याने त्यांनी आत्तापासुन तयारी सुरु केली आहे. त्यामुळे कोल्हेंचे काय होणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे आजी माजी खासदारांबाबत साशंकता असणार शिरूर महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ ठरणार आहे. पण कोल्हेंपेक्षा आढळरावांचा राजकीय गेम झाल्याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगली आहे. पण याचे उत्तर २०२४ लाच भेटणार असल्याने सर्व घडामोडी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!