Latest Marathi News

‘पठाण’च्या गाण्यावर या अभिनेत्रीचा दिपीकापेक्षा मादक अंदाज

अभिनेत्रीला गाण्यावर थिरकताना बघून चाहते घायाळ, डान्स एकदा बघाच

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शाहरुख खानच्या ‘पठाण’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. भगव्या बिकीनीमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण बेशरम गाणे चांगलेच लोकप्रिय झाले आहे.

बाॅलीवूडमधील काही कलाकारांनी या गाण्यावर वेगवेगळे रील्स बनवून या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे पण एका अभिनेत्रीने बनवलेले रोल्स पाहून चाहते चकित झाले आहेत. भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर डान्स केला आहे.या गाण्यात नम्रताने केलेला डान्स पाहुन चाहते फिदा झाले आहेत.नेटकऱ्यांना तिच्या या मोहक आणि मादक अदा प्रचंड आवडल्या आहेत. या व्हिडिओ खाली कॉमेंट करत लोकांनी ‘दीपिकापेक्षा ही जास्त शोभली असती’ असं कॉमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या आधीही नम्रताने भगव्या रंगाची बिकिनी घालून डान्स केला होता, तेंव्हा तिला ट्रोल करण्यात आले होते.

नम्रता मल्ला भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा नम्रता तिचे व्हिडीओ व फोटो शेअर करत असते. दरम्यान हॉट अवतारात नम्रताला गाण्यावर थिरकताना बघून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!