Latest Marathi News

‘त्या’ कारणामुळे दोन भावांनी केली विजयची हत्या

पुरावा नष्ट करण्यासाठी वापरली 'ही' पद्धत, पुण्यातील या घटनेने खळबळ

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानसिक त्रास देत असल्याने पुण्यातील एका युवकाचा लोखंडी सळईने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात तो मृतदेह पुरण्यात आला होता. पण अखेर पोलीसांनी त्यांना अटक करत भंडाफोड केला आहे. पानशेत जवळील कुरण गावात ही हत्ता करण्यात आली होती.

विजय प्रफुल्ल काळोखे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नितीन रामभाऊ निवंगुणे व विजय दत्तात्रय निवंगुणे यांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणारा विजय काळोखे हा नितीन निवंगुणे याला वैयक्तिक कारणावरून मानसिक त्रास देत होता. घटनेच्या दिवशी विजय निवंगुणे आणि नितीन निवंगुणे हे आंबी गावाजवळ थांबले होते. यावेळी विजय काळोखेही तिथे पोहोचला आणि नितीनला शिवीगाळ करू लागला. नितीन याने त्याला “शिवीगाळ करू नको,” असे सांगूनही तो शिवीगाळ करत होता. नंतर विजयने विजय निवंगुणेलाही शिविगाळ सुरु केली. त्यामुळे नितीन व विजय निवंगुणे यांनी लोखंडी अँगल व रॉडने विजय काळोखेला मारहाण करत त्याची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी नितीन निवंगुणे याने शेतात घर बांधण्यासाठी एक वर्षापूर्वी खोल खोदलेला होता. त्या खोल खड्ड्यात विजय काळोखे याचा मृतदेह पुरून ठेवला होता.

या प्रकरणी पानशेत पोलीस चौकीचे पोलीस नाईक अजयकुमार शिंदे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीसांनी तपासाची सूत्रे हलवत दोन्ही भावांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!