Latest Marathi News
Ganesh J GIF

पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत

खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पुणे दि ८(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद या पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. तरी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

दिवे घाटातून जाणारा हा मार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने वन विभागाच्या परवानगीची अडचण होती. परंतु खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीने हा विषय मार्गी लागला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणारा पालखी सोहळा लवकरच सुरु होत असून वारकऱ्यांच्या व नागरीकांच्या सुविधा लक्षात घेता हा मार्ग पुर्ण होणे गरजेचे आहे. याबाबतच्या सर्व अडचणी दूर झालेल्या असून हे काम तातडीने सुरु करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!