“शिवमति,शिवकन्या,शिवश्री” मराठमोळ्या फॅशन शो’ चे आयोजन
मिस,मिसेस,मिस्टर महाराष्ट्र 2023 चे मानकरी होण्याची संधी, टेकवीण स्टुडिओ व स्वराज्य प्रॉडक्शनचे आयोजन
पुणे दि १५(प्रतिनिधी)- टेकवीण स्टुडिओ व स्वराज्य प्रॉडक्शनच्या वतीने मिस,मिसेस,मिस्टर महाराष्ट्र 2023 या मराठमोळ्या फॅशन शो चे आयोजन पुण्यात करण्यात आले आहें .यामध्ये शिवमति,शिवकन्या,शिवश्री हे मुख्य टायटल असणार आहे.यामध्ये स्पर्धकांचा संपूर्ण मराठमोळा पेहराव असणार् आहे.आगळा वेगळा असा हा पारंपरिक मराठमोळा फॅशन शो पुण्यामध्ये होणार आहें.या शो साठी मराठी हिंदी चित्रपट व फॅशन ,मॉडेलिंग क्षेत्रातील अनेक कलाकारांची उपस्थिती असणार आहे .महाराष्ट्रामधून सर्व जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होत आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ झालेल्या या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे आयोजक टेकवीण स्टुडिओचे संचालक डॉ.विजय ठाकरे,अभिनेत्री अपेक्षा पांचाळ, मॉडेल निकेता कल्याणकर, मॉडेल वृषाली बुचडे, स्नेहा सॅमसन, रोहित सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. फॅशन शो बद्दल आयोजक डॉ.विजय ठाकरे म्हणाले फॅशन शो च्या माध्यमातून आपली मराठमोळी संस्कृती लोकांसमोरच पोहोचावी तसेच फॅशन इंडस्ट्री मध्ये येणाऱ्या तरुण-तरुणीना तसेच गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सौंदर्य स्पर्धा म्हटंले की सहभागांसाठी अनेक निकष लावले जातात. पण या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय, वजन, ऊंची याचे कोणतेही निकष लावण्यात आलेले नाही. ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली असणार आहे.