Just another WordPress site

संतापजनक! पतीचा बायकोवर अॅसिड हल्ला

आरोपी पती फरार, या कारणामुळे पत्नीवर केला हल्ला

रांची दि २८(प्रतिनिधी)- झारखंडची राजधानी रांची जवळ एक खळबळजनक घटना घडली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोवर मुद्दामून अँसिड फेकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यात बायको गंभीररीत्या जखमी झाली.हे कृत्य करणारा नवरा अमीर सध्या फरार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

GIF Advt

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमीर आणि हीना यांच्य लग्नाला १० वर्ष झाली आहे. त्यांना दोन मुलं आहेत. लग्नानंतर त्यांचा संसार सुरळीत सुरु होता.पण नंतर काही दिवसांनी त्यांच्यात वाद होऊ लागले. आरोपी अमीर हा दारू पिऊन त्याच्या बायकोला म्हणजेच हिनाला मारहाण करायचा. तिच्याकडे सारखी पैशाची मागणी करत होता. त्यामुळे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन पोहचले होते. पण कुटुंबीयांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले. अमीर हा एक मोबाईल रीपेअरिंगच दुकान चालवत. नेहमी पैसे मागून तो हिनाचा छळ करायचा. हीना जेव्हा जेव्हा माहेरी यायची, तेव्हा तेव्हा ती पाच ते दहा हजार रुपये घेऊन परतायची, अशी माहिती समोर आली. पण एवढ्यावरच न थांबता अमीरने हे किळसवाणे कृत्य केले आहे. सध्या हीना गंभीररीत्या जखमी आहे. अॅसिड हल्ल्यात ती प्रचंड भाजली गेली आहे.

पोलिसांनी अँसिड हल्ल्याची नोंद घेतली असून आता पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी हीना आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदावले आहडत. फरार आरोपी अमीर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनीही तपास सुरु केला आहे. पण सध्या तरी तो फरार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!