Latest Marathi News
Ganesh J GIF

‘भाजपच्या टग्यांकडून शिवरायांचा अवमान तरीही शहाणपणा शिकवतात’

राऊतांचा भाजप,शिंदे गटावर हल्लाबोल, राज ठाकरेंना या अभिनेत्याची उपमा

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- छत्रपतींचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे, त्यांचा अपमान म्हणजे मराठी मातीचा अपमान आहे. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवरायांचा एवढा घनघोर अपमान करुनसुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, ज्यांनी स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून पक्ष सोडला ते आमदार हात चोळून कसे बसलेत? भाजपचे टगे महाराजांचा अवमान करतायेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड शिवलं की काय?, असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊत यांनी कर्नाटक मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोश्यारी यांनाही लक्ष केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष जी पावलं उचलायची आहेत ती उचलतोच आहोत. संभाजीराजे, उदयनराजेंनी घेतलेली भूमिका म्हणजे लोकभावना आहे. महाराष्ट्राने अजूनही संयम राखला आहे आणि इकडे भाजपवाले त्यांचं लंगडं समर्थन करतायेत. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडून शिवरायांचा अवमान झाला होता तेव्हा त्यांनी जाहीर माफी मागितली होती, एवढे ते मोठे होते. त्यांना ज्यावेळी कळलं की आपल्याकडून चूक झाली तेव्हा पंतप्रधानपदी असताना त्यांनी माफी मागितली, दिलगीरी व्यक्त केली होती. तसेच मोरारजी देसाई, त्याकाळचे मोठे नेते होते. महाराष्ट्राचा त्यांच्याशी भलेही वाद आहे पण त्यांच्याकडूनही छत्रपतींविषयी चुकीची विधाने गेल्यानंतर त्यांनीही माफी मागितली होती. पण सध्याच्या राज्यपालांनी अजूनही माफी मागितलेली नाही. असे म्हणत राऊत यांनी राज्यपालांवर निशाना साधताना सावरकरांबद्दल आदर असेल तर त्यांना भारतरत्न देत दिल्लीत त्यांचा पुतळा उभारा असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले आहे. महाविकास आघाडी लवकरच महाराष्ट्र बंदची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मिमिक्री केली होती त्याला उत्तर देताना राऊत यांनी राज यांची खिल्ली उडवली. राजकारण करणं म्हणजे मिमिक्री करणं नव्हे. आवाज काढणं वगैरे आता खूप झालं… याच्यापलीकडे जा.. आता आपण मॅच्युअर झालेला आहात. महाराष्ट्र पाहा… राजकारणात काही विधायक काम करा, संघटनात्मक काम करा असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!