फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे पीए जाहीर
पीए निवडीत फडणवीस यांचा वरचष्मा, सतरा मंत्री वेटिंगवर, पहा मंत्र्यांचे पीए
मुंबई – महायुतीचे सरकार सत्तेत आले असून आता राज्य सरकारचा कारभार सुरु झाला आहे. पालकमंत्रीही जाहीर झाल्यामुळे सरकारच्या कारभाराला गती येण्याची शक्यता आहे. पण फडणवीस यांनी मात्र सरकारवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. त्यांच्या परवानगीशिवाय त्यांनी खाजगी सचिव नेमण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळे मंत्र्यांंमध्ये अस्वस्थता आहे.
सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांसाठी ‘पीए’ आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. शासनाच्या कार्यालयीन आस्थापनेवर असलेल्या वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना आता मंत्र्यांच्या सेवेत रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यमंत्री म्हणून सहा आमदारांनी शपथ घेतली. त्यातील केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए मिळाले आहे. तर अद्याप १७ मंत्र्यांसाठी अद्याप पीएची नेमणूक करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस दावोसवरून आल्यानंतर राहिलेल्या मंत्र्यांची नेमणूक होणार आहे.
मंत्री आणि त्यांचे पीए
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे,
उपमुख्यमंत्री अजित पवार : पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे,
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींमी, तहसीलदार प्रशांत पाटील व कक्ष अधिकारी राहुल गांगुर्डे,
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील : उपायुक्त जयदीप पवार, नायब तहसीलदार डॉ. गौरी शंकर चव्हाण,
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ : अवर सचिव नंदकुमार आंदळकर, उपमुख्य कार्यकारी भूपेंद्र बेडसे,
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : लेखापरीक्षक बाळासाहेब यादव,
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत भामरे,
कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा : उपजिल्हाधिकारी महेश शेवाळे, पंकज पाठक,
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे : अपर जिल्हाधिकारी मंदार वैद्य,
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके : उपजिल्हाधिकारी ललीत वऱ्हाडे, डीपीओ मुरलीधर वाडेकर आणि तहसीलदार सुरेश कव्हाळे,
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे : उपसचिव संतोष गावंडे,
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले : एसडीओ सुधाकर भोसले,
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे : सहसचिव संतोष पाटील,
अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ : उपजिल्हाधिकारी मुकेश भोगे,
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे : उपसचिव प्रल्हाद रोडे,
सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट : उपलेखा अधिकारी अभय देशमुख,
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक : सहायक आयुक्त शरद खाडे,
रोहयो मंत्री भरत गोगावले : अवर सचिव गणेश काथवटे,
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील : उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील.
या मंत्र्यांना प्रतीक्षा
मंत्री संजय राठोड, नितेश राणे, उदय सामंत, गिरीश महाजन, गुलाबराब पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, जयकुमार रावल, अतुल सावे, शंभुराज देसाई, आशिक शेलार, आदिती तटकरे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आकाश पुंडकर, प्रकाश आबिटकर