Latest Marathi News
Ganesh J GIF

पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा निवडणयक लढणार?

धनंजय मुंडेसोबतचे राजकीय वैर संपल्यानंतर राजकीय तडजोड, पंकजा म्हणाल्या 'माझे समर्थक मला...

बीड दि १३(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर संपलेलं असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्यानंतर पंकजा मुंडे परळी मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सुचक विधान केले आहे. राज्यात आठ-दहा मतदारसंघ आहेत. तेथून लोक मला विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगतात. त्यात पाथर्डी हा एक मतदारसंघ आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा आहे. राज्यातील आठ-दहा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणहून मी विधानसभा लढवावी, अशी गळ लोक घालतात. ती लोकांची भूमिका राहिला आहे. त्यात पाथर्डी एक मतदारसंघ आहे. परंतु पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडले, असे ही मुंडे म्हणाल्या होत्या. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी अनेकदा मुंडे समर्थकांनी केलेली आहे. तर या मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी अनेकदा मुंडेंसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखविली आहे.त्यामुळे पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार अशी चर्चा रंगत आहे. कारण परळीतून पराभव झाल्यानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतले नव्हते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद यांच्याशी मतभेद झाल्याच्या चर्चेनंतर त्यांची राजकीय पिछेहाट झाली होती. पंकजा मुंडे सध्या पक्षाच्या महासचिव आहेत.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यावर बोलताना म्हणाल्या की, माझे समर्थक मला राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सांगतात. परंतु कुठेही जाणार नाही, मी माझ्याच मतदारसंघात आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी अशा कोणत्याही अफवा परसवू नयेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पाथर्डीतून नाही तर परळीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!