राज्यात सध्या मराठा आरक्षणाविषयी जी परिस्थिती सुरु आहे, त्याविषयी शरद पवारांना काय वाटते ते त्यांनी मांडले पाहीजे. पवारांनी त्यांची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करायला हवी. जर त्यांनी इतिहासात जे मांडले तसे मांडले तर स्वागत आहे.पण जे पुर्वी मांडले त्या व्यतिरिक्त काही मांडले तर लोक नक्कीच रिॲक्ट करतील. पवारांची आरक्षणाविषयी भूमिका काय आहे याबद्द्ल महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांनी मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका मांडणे महत्त्वाचे आहे, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. नुकतीच पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आज (सोमवार) त्या संभाजीनगरमधुन पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेले दिसून येत आहे. मराठा आरक्षणाबाबतीत शरद पवार आपली भूमिका का मांडत नाही, यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तर कदाचित मराठा आंदोलक मनोज जरांगे हे शरद पवारांच्या बोलण्याने हे आंदोलन करत आहेत का असे देखील चर्चा अनेक वेळेस केली जात आहे. तसेच आज पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी देखील शरद पवार मोठे नेते त्यांनी मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका मांडली पाहीजे, असे म्हटले आहे.