Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीनेवर प्रेम करतोय सैराटमधील परश्या आकाश ठोसर?

अभिनेत्रीच्या फोटोवर केली रोमँटिक कमेंट,गुलाबी प्रेमाच्या कमेटनंतर चाहते सैराट

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाचे याड अजूनही लोकांच्या डोक्यात आहे. आर्ची आणि परशाची जोडी त्यावेळी सगळ्यांनाच आवडली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खास आहे.

सैराट चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही जोडी लोकप्रिय झाली होती. पण आता ही जोडी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत.रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या फोटोशूटमधील काही निवडक फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रंगपंचमीच्या मुहूर्तावर रिंकूने शेअर केल्याने हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. यावर चाहत्यासह अक्षय ठोसरनेही दिलखेचक कमेंट केली आहे.रिंकूने शेअर केलेल्या फोटोवर आकाशने कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी असलेली स्माईली पोस्ट केली आहे. तर, रिंकूनेदेखील तशीच कमेंट करत आकाशला रिप्लाय दिला आहे. त्यामुळे दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर. मराठी अभिनेत्री साजली संजीवने ईमोजी शेअर करून फोटोचे कौतुक केलं आहे. चाहत्यांनी देखील रिंकुच्या फोटोचे काैतुक केले आहे.

‘सैराट झालं जी’ म्हणत महाराष्ट्राला याडं लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आज प्रसिद्ध आहे. पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मराठी कलाविश्वातील ती टाॅप अभिनेत्री बनली.रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सैराट, कागर,मेकअप या मराठी चित्रपटांसह ही वेबसीरिजमध्येही झळकली आहे. तसेच ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!