Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांना आहे इतका पगार

आमदारांना किती पगार मिळतो माहितेय का? माजी आमदारांना मिळते पेन्शन

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एप्रिल महिना जवळ आल्याने सगळ्यांना पगार वाढीचे वेध लागले आहेत. राज्यात देखील पगार वाढीच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. अगदी जुन्या पेन्शन मुद्यावर सरकार पेचात आहे. पण राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारमधील मंत्री आणि आमदारांचा पगार किती आहे हे पाहुन जाणून घेऊया.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पगार ३ लाख ४० हजार रूपये आहे. त्यात या वेतनात मूळ वेतन १ लाख ४५ हजार रुपये, तर ८६ हजार रुपये महागाई भत्त्यात समाविष्ट आहेत. याशिवाय ४० हजार रुपये प्रवास भत्ता आणि इतर लहान भत्त्यांच्या स्वरूपात जोडले जातात. या पगाराशिवाय मुख्यमंत्र्यांना सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, निवासी सुविधा, वीज आणि फोनची सुविधा मिळते. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पेन्शन म्हणून ठराविक रक्कम मिळते. तर त्यांना आमदाराचेही वेतन दिले जाते.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पगार कॅबिनेट मंत्र्यांच्या दर्जाप्रमाणे दिले जाते. कारण मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या पदांप्रमाणे, उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नाही. उपमुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळतात. महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्र्यांच्या पगारात वाढ झाल्यानंतर, उपमुख्यमंत्र्यांना राज्याच्या मुख्य सचिवांच्या बरोबरीचे वेतन मिळते, जे सुमारे २ लाख ५० हजार रुपये आहे. याशिवाय उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, निवासी सुविधा, वीज आणि फोन सुविधाही दिल्या जातात. याचबरोबर सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना एका महिन्याचा पगार साधारण १ लाख ८० हजार आहे. याव्यतिरिक्त त्यांना महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे, असं मिळून हा आकडा २ लाख ३० हजार होतो. तसेच माजी आमदारांना ५० हजार पेन्शन म्हणून देण्याची सुद्धा तरतूद आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींना दरवर्षी १८१ कोटी रुपये वेतन व पेन्शनपोटी दिले जातात अशी माहिती आहे. सध्या राज्यातील विद्यमान विधसभेचे २८८ तर विधान परिषदेचे ७८ आमदारांना पगार तर ८१३ माजी आमदारांना दरमहा पेन्शन दिली जाते.

वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मानधनावर नजर टाकली असता देशात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांत तेलंगणाच्या मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर आहेत. सध्या, के चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना मासिक ४ लाख १० हजार रुपये मानधन म्हणून मिळतात. तर त्रिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सगळ्यात कमी म्हणजे १ लाख ५ हजार ५०० रुपये पगार मिळतो.

टीप – (ही बातमी विविध माहितीवर आधारित आहे)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!