पत्की यांनी निष्ठा कशी बाळगावी याचा परिपाठ घालून दिला
संसदपटू,अँड.स्व.व्यंकाप्पा पत्की यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, प्रतिक पाटील यांनी केला गाैरव
आष्टा दि.१४ (प्रतिनिधी)- जेष्ठ समाजवादी नेते,माजी आमदार, उत्कृष्ठ संसदपटू,अँड.स्व.व्यंकाप्पा पत्की यांना ९ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला आहे.
स्व.पत्कीसरांची निष्ठा,प्रामाणिकपणा, विविध विषयांचा सखोल अभ्यास आणि त्यांची सामान्य माणसाच्याबद्दलची तळमळ आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे,अशी भावना प्रतिक पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी डॉ.निलेश व्यंकाप्पा पत्की,प्रा.बाळासाहेब मासुले,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिक पाटील पुढे म्हणाले,स्व.पत्की सरांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकूल परिस्थितीत लोक लढे उभारून सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला आहे. त्यांचे मौलिक मार्गदर्शन माजी मंत्री जयंत पाटील यांना मिळाले आहे. ते अभ्यासू आणि निष्ठावंत नेते होते. निष्ठा कशी बाळगावी याचा परिपाठ त्यांनी घालून दिलेला आहे. यावेळी डॉ.निलेश पत्की, प्रा.बाळासाहेब मासुले यांनीही सरांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी संचालक प्रदीपकुमार पाटील, रमेश हाके,रघुनाथ जाधव,माजी संचालक श्रेणिक कबाडे,विराज शिंदे, माणिकराव शेळके,नंदकुमार पाटील,चिफ इंजिनिअर विजयराव मोरे,संग्राम चव्हाण, उमेश शेटे,महेश पाटील,जयवंत पाटील, सुधाकर पाटील,गटाधिकारी संग्राम पाटील, अतुल मुतालिक,डॉ.जयपाल तामगावे यांच्या सह ऊस उत्पादक सभासद,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी आभार मानले आहेत.