Just another WordPress site

पुणेकरांनो तुमच्या चिंतेत भर टाकणारी बातमी!

'या' तारखेपासून सीएनजी वाहनधारकांना मिळणार नाही सीएनजी? कारणही समोर

पुणे दि १५(प्रतिनिधी) – महागाईने नागरिक हैराण झाले असतानाच पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे नागरिक सर्वच त्रस्त झाले आहेत. पण एैन सणासुदीच्या काळात पुणेकरांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी सीएनजी चालक संपावर जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

GIF Advt

पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने १ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर हा संप २० ऑक्टोबरपासून होणार होता. मात्र दिवाळीचे कारण देत हा संप पुढील महिन्यात केला जाणार आहे. विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फक्त सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या इंधनाचा प्रश्न भेडसवणार आहे. त्यामुळे संप होण्याआधीच यावर काही तोडगा काढण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा पुणरकरांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अनेक रिक्षा सीएनजीवर असल्याने त्यांच्याकडूनही दरवाढ केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणा-या किंमतीमुळे अनेक वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला, तर काहींनी आपल्या गाडीत सीएनजीचे कीट बसवले. पण नंतर सीएनजीच्या दरातही विक्रमी वाढ झाली.मात्र आता पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या इशा-यामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!