‘पाटलाच्या पोरांना लग्नाआधी मूल होतात याचा अभिमान’
राष्ट्रवादीच्या नेत्याची जीभ घसरली गुन्हेगारीचे समर्थन, विरोधक आक्रमक
सोलापूर दि १२(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक असा सामना होत आहे. पण यावेळी राजन पाटील यांची जीभ चांगलीच घातल्याचे पहायला मिळाले यामुळे राजकारण तापले आहे. विरोधक आक्रमक झालेत.
टाकळी सिकंदर येथील प्रचाराच्या अंतिम सभेत बोलताना राजन पाटील यांनी महाडिकांवर टीका केली. महाडिकांनी राजन पाटील यांच्या मुलांवर टिका करताना बाळांनो असे बोलू नका असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली.ते म्हणाले ‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले. तसेच आमच्या पोरांनी वयाच्या १७ व्या वर्षीच ३०२ , ३०७ ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं आहे. त्यावर अनेक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाने सुप्रिया सुळे यांना टॅग करत काय प्रतिक्रिया देणार अशी विचारणा करत चाकणकर यांना पाटलांना नोटीस पाठवणार का? असे म्हणत टिका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते पण राजन पाटील यांचे विरोधक उमेश पाटील यांनी पाटील यांच्यावर टिका केली आहे. राजन पाटलांचं वक्तव्य हे महिलांचं अपमान करणारं आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरं झाली आहेत, असं सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी आपल्या या नेत्यावर काय कारवाई करणार? याची चर्चा सुरू झाली आहे.