Latest Marathi News
Ganesh J GIF

मैत्रिणीला मेसेज पाठवणाऱ्याला जाब विचारल्याने बेदम मारहाण

दिवाळीतही पुण्यात गुन्हेगारी कृत्यांना ऊत, हडपसरमध्ये टोळक्याची तरूणाला मारहाण, हा गुन्हा दाखल

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणे शहरात मागील काही दिवसापासून गुन्हेगार कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात आता हडपसर मधील वादाची भर पडली आहे. कारण मैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अमोल राजाराम घाटे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर अमर बसवराज जमादार, अमन अशोक नरोटे, श्रीपती संतोष सरोदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत घाटे याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी अमोल घाटे याच्या मैत्रिणीला आरोपींनी सोशल मिडियावर मॅसेज पाठविला होता. दरम्यान, हडपसर भागातील माळवाडी परिसरातून घाटे आणि त्याचा मावस भाऊ सुदर्शन दासवड जेवण करुन रात्री घरी निघाले होते. यावेळी आरोपी जमादार, सरोदे, नरोटे आणि साथीदार थांबले होते. यावेळी मैत्रिणीच्या मोबाइलवर संदेश का पाठविला, अशी विचारणा घाटेने आरोपींकडे केली. त्यानंतर आरोपींनी घाटेला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दासवड याच्यावर वार करुन आरोपी पसार झाले.

ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!