Latest Marathi News
Ganesh J GIF

घाणेरडे मेसेज करणाऱ्या नेटकऱ्याला प्रसिद्ध अभिनेत्रीने झापले

स्क्रीनशाॅट शेअर करत घेतली शाळा, अभिनेत्रीची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल म्हणाली "अनेक पुरुष अशा फोटोजवर...."

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. पण कधी कधी सक्रिय असण्याचा फटका देखील या लोकप्रिय कलाकारांना सहन करावा लागतो. पण काही चाहते मात कलाकारांच्या पोस्टला आक्षेपार्ह कमेंट करत असतात असाच काहीसा प्रकार प्रियदर्शनीसोबत घडला होता. पण तिने त्या वात्रट चाहत्याला चांगलेच झापले आहे.

प्रियदर्शनीने अलीकडेच तिचे काही वेस्टर्न लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केले होते. मात्र, एका नेटकऱ्याने तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवला. या मेसेजमुळे प्रियदर्शनी चांगलीच संतापली आणि तिने त्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. प्रियदर्शनीने एक पांढऱ्या कोटमधील लूकमध्ये फोटोशूट केला होता. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर एक युझरने अतिशय वाईट मॅसेज केला त्यामुळे ती चांगलीच भडकली आहे. त्यात तिला त्या युझरने “हॉटनेस दाखव की, … पांढऱ्या ड्रेसशिवाय तुझा काळ्या ट्रेसमधील …”, असे मॅसेज केले होते. प्रियदर्शनीने यावरुन एक सविस्तर पोस्टही लिहिली आहे. “अर्थात अशा कमेंट्स, मेसेज येणार! फोटो टाकतानाच कळायला पाहिजे. अनेक पुरुष अशा फोटोंवर खूप चांगली कमेंटही करतात. एखादा फोटो हॉट वाटणं आणि ते व्यक्त करणं ही गोष्ट आक्षेपार्ह नाही. पण, अशा पद्धतीचे मेसेज नक्कीच आक्षेपार्ह आहेत. आणि ते इग्नोर करत राहिलो तर सवयीचं होईल. म्हणून हे सगळं लिहिणं. आणि या उपर फोटोचा काही संबंध नसतानाही असे अनेक मेसेज अनेक मुलींना येत असतात. काही प्रमाणात मुलांनाही येत असतात. तर या सोशल मीडियाच्या निनावी जनतेला तसं तर आपण काही करू शकत नाही. फक्त आपल्या बाबतीत रिपोर्ट करू शकतो,” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल करणे, त्यातून त्यांच्या फोटोंखाली अश्लील किंवा आक्षेपार्ह कमेंट्स करणे यामुळे अशावेळी अशा घडल्या प्रकारांची बरीच चर्चा असते.  नुकताच रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडीओ हा व्हायरल झाला होता. त्यामुळे अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे बनले आहे. दरम्यान विनोदाचं अचूक टायमिंग आणि दमदार अभिनयाने प्रियदर्शनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळाले आहे.

प्रियदर्शनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांनी तिच्या पाठिंब्यासाठी पुढे येत तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेल्या प्रियदर्शनीने चित्रपटांतही काम केलं आहे. ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. शाहीद कपूरच्या फर्जी या वेब सीरिजमध्येही प्रियदर्शनी झळकली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!