Latest Marathi News
Ganesh J GIF

पेट्रोल पंप मॅनेजरचा चाकूने भोसकून खून

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, कर्मचारीही जखमी, दोन संशयीत ताब्यात

अ.नगर दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मुंबई पुणे नंतर हे लोन आता नगर जिल्ह्यात पोहोचले आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातनंतर युवकाने पंपावरील मॅनेजरचा खून केला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

कोपरगाव येथील रहिवासी गुलाम भोजराज बापूराव घनघाव असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या मुंबई नागपूर महामार्गावर संवत्सर शिवारात गुरुराज पेट्रोल पंप आहे. या पंपाचे भोजराज घनगाव हे मॅनेजर होते. दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तीन युवकांनी पेट्रोल पंपावर आले होते. त्यांच्यापैकी दोन इसम हे मोटार सायकलवर वरुन खाली उतरले आणि त्यांनी कर्मचारी सोबत मारहाण सुरू केली. यावेळी मॅनेजर भोजराज बापुराव घनघाव यांनी मध्यस्ती करत तु माझ्या माणसाला मारहाण का केली असे विचारले. त्यावेळी मॅनेजरने युवकाला चापट मारली. याचा राग आल्याने हल्लेखोरांनी कमरे जवळुन एक धारदार चाकु काढुन, मॅनेजर भोजराज घनघाव यांच्यावर चाकुने पोटात व खांद्यावर वार केले. यानंतर हल्लेखोर मोटरसायकलवरून पळून गेले. यावेळी घनघाव यांना उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशलिटी शिर्डी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी अमोल मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात हल्लेखोराविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत पेट्रोल पंपाजवळील हॉटेलवरील एक कर्मचारीही संशयिताने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान याप्रकरणी काही तासातच नाशिक व शिर्डी येथून दोन संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले करीत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!