Latest Marathi News
Ganesh J GIF

‘फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य, राज्यात नव्या वादाची शक्यता

ओैरंगाबाद दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ताधारी भाजपामधील मंत्री आणि नेत्यांची आक्षेपार्ह वक्तव्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता या यादीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा समावेश झाला आहे. ओैरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं आहे. या मुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेतील पैठण येथील संतपिठाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत, त्यामुळे त्यांची मदत घेऊन ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढं गेलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने आदर्श संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होते.चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी “भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे.अशी टिका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!