
तिने हनीट्रॅपमध्ये अठरा आमदार तीन मंत्री आणि प्रसिद्ध व्यक्तींना अडकवले
पोलीसांनी अटक करताच दिला धोक्याचा इशारा, म्हणाली मी तोंड उघडले...
भुवनेश्वर दि ९(प्रतिनिधी)- ओडिशामध्ये हनीट्रॅपमुळे सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. हनीट्रॅपमध्ये अडकवून मोठ्या व्यक्तींना फसवल्याचा आरोप असणारी अर्चना नागने मी तोंड उघडलं तर ओडिशामध्ये सगळं काही बदलेलं, असा धमकीवजा इशारा दिला आहे.त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. एका चाैकशीनंतर तिने हा दावा केला आहे.
हनीट्रॅपमुळे ओडिशाच्या राजकारणात वादळ आणणाऱ्या जोडप्याची चौकशी ईडीने सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अर्चना आणि तिचा पती जगबंधू यांच्यावर हनीट्रॅपमध्ये आत्तापर्यंत 18 आमदार, 3 मंत्री, अनेक मोठे अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढत फसवल्याचा आरोप आहे. अर्चनाचा पती राजकीय आणि प्रसिद्ध व्यक्तींना आपली ओळख एका प्रमुख राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून करून द्यायचा. त्यानंतर आणखी ओळख वाढवण्यासाठी दोघे श्रीमंत व्यक्तींना आपल्या घरी बोलवायचे. त्यांना जेवणाचं निमंत्रण द्यायचे. चांगली ओळख झाल्यावर दोघे त्या व्यक्तीला जाळ्यात अडकवायचे. त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करायचे. बेडरुममध्ये त्यासाठी त्यांनी स्पाय कॅमेरा लावला होता. पुढे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळायचे. हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू होता.ओडिशातील चित्रपट निर्माता अक्षय परीजा याला देखील जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्याने यावर भाष्य केल्यानंतर हे हनीट्रॅप प्रकरण समोर आले आहे. पण अर्चनाने पोलीसांवर आरोप करत एक इशारा दिला आहे. मला चुकीच्या पद्धतीने अडकण्यात आलं आहे. मी तोंड उघडलं तर राज्यात मोठं परिवर्तन होईल, असा सूचक इशारा तिने दिला आहे. यामुळे या प्रकरणातील गुंता वाढला आहे.
ओडिशाच्या बोलांगीरमध्ये राहणारी अर्चना २०१५ मध्ये भुवनेश्वरला पोहोचली. तिने इंटिग्रेटेड लॉ कोर्ससाठी प्रवेश घेतला. २०१७ मध्ये अर्चनाची भेट बालासोर जिल्ह्यातील जगबंधू चंदशी झाली. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यानंतर त्यांनी हा भलताच उद्योग सुरु केला.