Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठा समाज आणि महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा पीआय बडतर्फ

आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, मराठा संघटना आक्रमक, अखेर वर्दीच उतरली

जळगाव – राठा समाज आणि मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असलेली जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप समोर येताच मराठा समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे बकाले यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती समोर आली होती. या क्लिपमध्ये ते मराठा समाज आणि मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत होते. बकाले यांना सेवेतून बडतर्फ यावे आणि त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत होती. आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपच्या सतत्येची पडताळणी करत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी विभागीय चौकशी करत त्याचा अहवाल पोलिस महासंचालकांकडे दिला होता. चौकशीत बकाले यांना दोषी ठरवून त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पोलिस महासंचालकांच्यासमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी देखील बकाले यांना देण्यात आली होती. मात्र, त्याने नवीन कोणताही मुद्दा मांडला नाही तसेच त्याच्यावरील आरोपांचा प्रतिवाद देखील करता आला नाही. अखेर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बकाले याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश काढले. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजीच बडतर्फीचे आदेश जारी केले होते, मात्र त्याची प्रत संघटनेला नुकतीच मिळाली आहे.

मराठा समाजातील संघटनांकडून फक्त निलंबन नको तर सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. कारवाई न झाल्यास जाणीवपूर्वण मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या मनोविकृतीला त्यांच्याच भाषेत उत्तर देखील समाजात असल्याचा इशारा देण्यात आला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!