Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूड अभिनेत्री विरोधात पोलीस तक्रार दाखल

ती इनस्टाग्राम पोस्ट करणे पडले महागात, बघा नक्की प्रकरण काय

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि टाॅलीवूडची अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चित्रपटांपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असते. अलीकडेच तापसीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यात तिच्यावर देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तापसीने बोल्ड ड्रेसवर आराध्य देवी लक्ष्मीमातेचे लॉकेट गळ्यात घातले होते. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील चर्चेत असते.अभिनेत्रीने डीप नेक आउटफिटसह अशी अॅक्सेसरी कॅरी केली आहे,ज्याला पाहून सोशल मीडिया युजर्स नाराज झाले तिच्यावर टीकाही झाली होती.तापसी पन्नूने लॅक्मे फॅशन वीकमध्ये लाल रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला होता. तापसी पन्नू व्हिडिओने लाल रंगाच्या बोल्ड नेक ड्रेससह गळ्यात लक्ष्मी असलेला नेकलेस घातला आहे. जेव्हा तिने फॅशन वीकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा तिच्या लुकचे कौतुक करण्याऐवजी युजर्स तिच्यावर संतापले आणि तिने हिंदू देवीचा अपमान केल्याचा आरोप केला होता. इंदूरमध्ये, हिंदू रक्षक संघटनेने चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नूवर अश्लीलता पसरवल्याचा आणि हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे निमंत्रक एकलव्य गौरने छत्रीपुरा पोलिस ठाण्यात तापसीविरोधात तक्रार दाखल केली आहे.हिंदू रक्षक या संघटनेने याप्रकरणी अभिनेत्री तापसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास निदर्शने करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. तापसीला या आधी जोरदार ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी कमेंट करताना एकाने लिहिले, “अशा वल्गर ड्रेसवर माता लक्ष्मीचा हार घातला आहे. तुला लाज वाटत नाही का?’, अजून एकाने लिहिले, “हे लोकं आपल्या सनातन धर्मालाच टार्गेट करतात. लाज वाटायला पाहिजे होती हा हार घालताना.” तर एकाने लिहले, “देवाचे चित्र असणारा नेकलेस घाणेरड्या ड्रेसवर घातला आहे, थोडी तर लाज वाटू द्या.”

तापसी लवकरच अनुभव सिन्हाच्या ‘अफ़वाह’मध्ये दिसणार आहे. ‘फिर आई हसीना दिलरुबा’ या सिनेमात देखील ती दिसणार आहे. तापसीने २०१० मध्ये करिअरला सुरुवात केली. २०१३ मध्ये आलेल्या ‘चश्मेबहाद्दुर’ या कॉमेडी सिनेमातून तिने पदार्पण केले. लवकरच ती शाहरुख खान सोबत ‘डंकी’ या सिनेमात दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!