Latest Marathi News
Ganesh J GIF

कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी पोलीस या अभिनेत्रीला पाठवणार समन्स

प्रसिद्ध अभिनेत्रींच्या पतीमुळे चार अभिनेत्रीची अडचण वाढणार?, फसवणूक प्रकरणामुले बॉलीवूड हादरले, प्रकरण काय?

मुंबई – शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याशी संबंधित ६० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील नवीन पैलूंचा तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात आणखीन तीन अभिनेंत्रीची नावे समोर आली आहेत. त्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

राज कुंद्राने बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांची नावं घेतली आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून राज कुंद्राची पाच ते सहा तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने उघड केलं की ६० कोटींपैकी काही रक्कम बिपाशा आणि नेहाला फी म्हणून देण्यात आली होती. तपासादरम्यान कंपनीच्या खात्यांमधून शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू आणि नेहा धुपियासह चार अभिनेत्रींच्या खात्यांमध्ये थेट पैसे हस्तांतरित करण्यात आल्याचे आढळून आले आहे. याशिवाय बालाजी एंटरटेन्मेंटसोबतही काही संशयास्पद व्यवहार झाले का, याचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंतच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला तब्बल २५ कोटी रुपयांच्या थेट ट्रान्सफरचे पुरावे मिळाले आहेत. नोटाबंदीच्या काळात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर रोख रकमेच्या तुटवड्याचा परिणाम झाला होता. त्यादरम्यान इतर खात्यांमध्ये काही संशयास्पद निधी हस्तांतरण केले गेले होते. पैशांच्या या ट्रान्सफरचे पुरावे आता EOW ला मिळाले आहेत. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अधिकाऱ्यांचा तपास सुरूच असून राज कुंद्राला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. याप्रकरणात आणखी काही नावं समोर येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत EOW या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींनाही समन्स बजावण्याची शक्यता आहे. आता EOW लवकरच अभिनेत्री बिपाशा बसू, नेहा धुपिया आणि निर्माती एकता कपूर यांना पत्र पाठवणार आहे. यामध्ये त्यांना बेस्ट डील टीव्हीकडून किती पैसे मिळाले, कोणत्या चॅनेलद्वारे आणि त्यांनी पैसे कसे वापरले हे स्पष्ट करण्यास सांगितले जाणार आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक प्रमुख स्टार्सची नावे समोर आल्यामुळे बॉलीवूडबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

ऑगस्टमध्ये शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका व्यावसायिकाची ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडडे संचालक दीपक कोठारी यांनी ही तक्रार दाखल केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!