सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या पवारांच्या दुर्मिळ फोटोची पाॅवरफुल चर्चा
शरद पवारांचा कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल, लोकांच्या भुवया उंचावल्या
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नेहमीच चर्चेत असतात. राजकारणात घडणाऱ्या कोणत्याही घटनेमागे शरद पवारच असतात असे आजही बोलले जाते. आज घडलीही ते राजकारणात कमालीचे सक्रिय आहेत. मात्र, सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे पवार चर्चेत आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु आहे.सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा सोबत बसलेला एक फोटो पोस्ट केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो किमान ४० ते ५० वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. यात शरद पवार यांनी चक्क फ्रेंच स्टाईल दाढी ठेवली आहे. आजवर शरद पवारांचे अनेक फोटो लोकांनी पाहिले आहेत. पण त्याामुळे काळीभोर फ्रेंच कट दाढी राखलेल्या शरद पवारांचा हा फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी ‘नोस्टाल्जिया’ अशी कॅप्शन दिली आहे. सध्या सोशल मिडीयावर शरद पवारांचा या लूकवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. जनतेनं शरद पवारांना त्यांच्या सध्याच्या लुकमध्येच पाहिलं आहे. काळीभोर दाढी पाहात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी शेअर केल्यानंतर या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका युजरने हे nostalgic नाही तर एक सरप्राइज आहे असं म्हटलं आहे. तर ”शरद पवारांना फ्रेंचकटमध्ये कधीच पाहिलेलं नाही. ते फारच वेगळे दिसत आहेत”, अशी पोस्ट एका युजरनं केली आहे. Dashing Look अशी कमेंट एका युजरने केली आहे.