Latest Marathi News
Ganesh J GIF

कल्याण रेल्वे स्थानकात रात्रीस चोरीचा खेळ चाले

रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडिओ समोर, प्रवाशांंमध्ये भीतीचे वातावरण

कल्याण दि २३(प्रतिनिधी)- कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर पहाटे तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. तर एकाचा शोध सुरू आहे.

आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. दीपक मगर, कुणाल गोंधळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. साहिल काकद नावाचा त्यांचा साथीदार पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाच्या नव्या पादचारी पुलावर सुखवीर सिंग हा प्रवासी झोपला होता. सुखवीर सिंह हे उत्तर प्रदेशवरून कल्याण रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यांना सकाळी पुण्याला जायचे होते. गाडीची वाट पाहत पुलावर बसले असताना त्यांचा डोळा लागला. सुखवीर झोपले असल्याचे पाहून चार जण त्यांच्याजवळ आले. या चौघांनी सुखवीर सिंह यांना लाथ मारून उठवले. त्यानंतर धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतले. यानंतर इतर दोन प्रवाशांना देखील त्यांनी मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल आणि काही रोकड हिसकावल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सुखबीर सिंग यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या आरोपींचा शोध सुरू केला. कल्याण जीआरपीच्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं. तर चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

रेल्वे स्टेशन परिसरात मारहाण करून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार सुरू झाल्याने प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण आहे. रात्री स्टेशन परिसरात पोलीस ग्रस्त का घालत नाही, असाही सवाल रेल्वे प्रवासी संघटनाकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान धमकावण्याच्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!