प्रणिती शिंदे म्हणतात ‘कोण रोहित पवार’
सोलापूर लोकसभेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली, बघा काय वाद
सोलापूर दि १०(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरी आत्तापासुन जागा वाटपावर चढाओढ सुरु झाली आहे. पण त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात वादाचा कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला आहे.
सोलापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला द्यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. कारण जागा वाटपात हा मतदारसंघ पहिल्यापासून काँगेसकडे आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी खरपूस शब्दांत रोहित पवार यांचा समाचार घेतला आहे. कोण रोहित पवार? असा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली आहे. ‘रोहित पवार यांची आमदारकीची पहिली टर्म आहे, त्यामुळे पोरकटपणा असतो काही जणांमध्ये. मॅच्युरिटी यायला वेळ जातो,’ असं म्हणत शिंदे त्यांनी रोहित पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.यावर आगामी काळात राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
सोलापुरातील राजकारणात बदल होणं गरजेचं आहे, त्यामुळे येथील आमदार व खासदार बदलले पाहिजे.’ असे वक्तव्य मध्यंतरी रोहित पवार यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त चिमणीवर भाष्य करताना
‘सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरून व्यक्तीगत राजकारण सुरू आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद झाला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच मोठं नुकसान होईल. असे मत रोहित पवार यांनी मांडले होते.