Latest Marathi News
Ganesh J GIF

बुलढाणा लोकसभेत शिंदे गटाचे प्रतापराव जाधव पराभूत होणार?

भाजपाच्या सर्व्हेक्षणात शिंदे गटाचे जाधव पिछाडीवर, शिंदे गटाकडून हे आमदार लोकसभा लढवणार, युतीत वादाची ठिणगी?

बुलढाणा दि १२(प्रतिनिधी)- भाजपाकडून लोकसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भाजपा यावेळेस शिंदे गटाच्या मतदारसंघावर देखील दावा करत आहे. पण शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाला आव्हान देत बुलढाणा मतदासंघ शिंदे गटाकडेच राहिल असे बजावले आहे. त्यामुळे एैन दिवाळीत भाजपा आणि शिंदे गटात वादाचे फटाके फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षातील १८ खासदारांपैकी १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तर भाजपाने यंदा लोकसभा निवडणूकीत ४५ जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्यातच भाजपाने शिंदे गटाच्या १३ मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे. बुलडाण्याची ही जागा चार नंबरवर दाखवण्यात आली आहे. बुलडाणा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नाही, त्यामुळे भाजपा शिंदे गटाच्या ताब्यातील काही जागांवर दावा करत आहे. यावर संजय गायकवाड यांनी भाजपाला आव्हान दिले आहे. भाजपच्या मागणीवर आमदार गायकवाड म्हणाले की, शिवसेनेची बुलडाण्याची जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीत भाजपला देणार नाही. आम्ही जिवाचे रान करून खासदार प्रतापराव जाधव यांनाच निवडून आणू. पण, भाजपवाल्याचं म्हणणं असेल की प्रतापराव जाधव हे निवडून येत नाहीत, तर मग बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांचे बॅनर मतदारसंघात अनेक ठिकाणी लागले आहेत. त्यात आमदार गायकवाड यांच्या पाठीमागे संसदेचे छायाचित्र छापण्यात आले आहे. त्यामुळे गायकवाड यांनी लोकसभेची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. पण भाजपाचे कारण पुढे करत प्रतापराव जाधव यांचा पत्ता गायकवाड कट करत आहेत का? याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

तीन टर्मपासून बुलढाणा लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदार प्रतापराव जाधव यांना शिंदे गटाकडून डच्चू दिला जाणार की, भाजपाच्या सर्व्हेला बगल देत जाधव यांनाच उमेदवारी मिळणार हे पहावे लागणार आहे. पण महायुती सरकारमध्ये बुलढाण्याच्या जागेवरुन ठिणगी पडल्याचे म्हटले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!