Latest Marathi News
Ganesh J GIF

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरला?

लोकसभेसाठी माजी आमदारांच्या सूनबाई मैदानात, काँग्रेस गड जिंकणार की, भाजपा जागा राखणारी?, असे असणार राजकीय समीकरण

नांदेड दि १२(प्रतिनिधी)- नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांचा पराभव करत भाजपाने तो मतदारसंघ स्वतःकडे खेचून घेतला. पण आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ स्वतः कडे घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार देखील निश्चित केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यमान खासदार चिखलीकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात २०१९ साली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे चव्हाण यांना फटका बसला होता. पण आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्याला लोकसभा एैवजी विधानसभेलाच पसंती दिली आहे. त्यामुळे भाजपाने या जागेसाठी नवीन उमेदवाराचा शोध घेतला जात होता. पण आता काँग्रेस पक्षाला नवीन उमेदवार मिळाला आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डाॅ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. खतगावकार ह्या रामतीर्थमधून जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत. तसेच विविध भागात आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मीनल यांचे सासरे देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. या मतदारसंघासह इतर काही तालुक्यांत भास्करराव पाटील खतगावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. याचा फायदा मीनल यांना भेटण्याची शक्यता आहे. खतगावकर कुटुंबाने २०१४ साली काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. पण २०२१ साली त्यांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि भास्कर पाटील खतगावकर यांचा आशीर्वाद जर मीनल पाटील यांना मिळाला, तर त्यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक सोपी ठरू शकते. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय काॅंग्रेस हायकमांड घेणार आहे. पण सध्या तरी मीनल यांचेच नाव आघाडीवर आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सूर्यकांता पाटील यांना १९९१ साली उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्या विजयी देखील झाल्या होत्या. आता तब्बल ३२ वर्षानंतर काँग्रेस उमेदवाराला संधी देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मीनल यांच्या समर्थकांकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असा उल्लेख केला होता. त्यामुळे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!