Just another WordPress site

दारूबंदी अधिकाऱ्याचा दारू प्यायल्याने मृत्यू

रायगड जिल्ह्यातील या घटनेची होतेय सगळीकडे चर्चा

रायगड दि ३ (प्रतिनिधी)- लोकासांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. कारण महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू दारुच्याच अतिसेवनाने झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दारूमुळे आयुष्याची वाट लागू शकते हे महिती असुनही सुद्धा लोक दारु पिताना दिसतात. पण त्या अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे चर्चा रंगली आहे.

GIF Advt

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारूचे अतिसेवन करण्याचे व्यसन होते. मागच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अजून पोस्ट माॅटम झाले नसले तरीही प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हा दारु अतिसेवन केल्यामुळे झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादक म्हणून कार्यरत होते. त्यांना अति दारु पिण्याची सवय होती. घटनेच्या दिवशीही त्यांनी दारुचे अतिसेवन केले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. दारुबंदी अधिका-याचा मृ्त्यू दारुच्या सेवनामुळे झाल्याने या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे.

राज्यात दारू बंदीसाठी अनेक ग्रामपंचायतींनी जोरदार आवाज उठवत दारुबंदी केली. दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याने राज्य शासनाकडून ही दारूबंदी कायद्याबाबत विचार विनीमय झाला. दारूमुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. दरम्यान दारूमुळे आयुष्याची वाट लागू शकते हे महिती असुनही सुद्धा लोक दारु पिताना दिसतात. पण त्यांच्या प्रबोधनाची जबाबदारी असणारेही दारूच्या आहारी गेल्याचे दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!