Latest Marathi News
Ganesh J GIF

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांकडून समाजसेवकाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरलं

त्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही महिलांनी मिळून समाजसेवकाला बेदम मारहाण केली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत या महिलांनी त्याला मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?

संभाजीनगरमधील तालुका कन्नड या ठिकाणी ही घटना घडली आहे. शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब या महिलांनी विचारला असता यावर सामाजिक कार्यकर्त्यानं महिलेला शिवीगाळ केली तसेच मारहाणही केली, असा आरोप महिलांनी केला. 

यानंतर महिलांनी आक्रमक पवित्रा घेत त्या सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यामध्ये परस्पराविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!