Latest Marathi News
Ganesh J GIF

जिथे खून केला त्या ठिकाणीच पुणे पोलीसांनी आरोपींची धिंड काढली

केशवनगरमध्ये खुन करणाऱ्या टोळक्याच्या पुणे पोलीसांनी आवळल्या मुसक्या, व्हिडिओ व्हायरल

पुणे दि ११(प्रतिनिधी)- नशेत हुल्लडबाजी करणार्‍या टोळक्याला हटकल्याने त्यांनी कोयत्याने सपासप वार करत मुंढव्यात व्यावसायिकाचा खून केला होता. पोलीसांनी त्या आरोपींना अटक करुन गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी त्यांची त्यांच्याच परिसरातून धींड काढली आहे.

घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्यास हटकल्यााने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून रवींद्र दिगंबर गायकवाड यांचा खून केला. मुंढवा भगातील केशवनगर येथे हा प्रकार उघडकीस आला होता. गायकवाड यांची हत्या झाल्यानंतर मुंढवा आणि केशवनगर गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपींचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नागनाथ पाटील, रोहित घाडगे, सनी चव्हाण अशा आरोपींचे नाव आहेत. या आरोपींना आज पोलिसांनी अटक केली आणि त्यांची धिंड काढली. ज्येष्ठ नागरिकाचा किरकोळ कारणामुळे हत्या करणाऱ्या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीसांनी ही धिंड काढली आहे. या रिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने हैदोस घातला होता. काही दिवसापूंर्वी येरवडा येथे अज्ञात कोयता माजी नगरसेविकेच्या घरासमोर लावलेल्या चार चाकी गाड्यांची रात्रीच्या वेळी तोडफोड केली होती. पोलिसांच्या कारवाईनंतरही कोयता ग्ँगची दहशत वाढतच आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!